घरमहाराष्ट्रCongress VS BJP : बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

Congress VS BJP : बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

Subscribe

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज (28 मार्च) केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागलेला नसतानाही बावनकुळे यांनी निकाल लागल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला आहे. हा गंभीर गुन्हा असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. (Congress VS BJP Violation of code of conduct by Chandrashekhar Bawankule Congress files complaint with Election Commission atul londhe)

हेही वाचा – Praniti Shinde : भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना का बोलता? प्रणिती शिंदेंचा सातपुतेंना सवाल

- Advertisement -

यासंदर्भात अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. 28 मार्च 2024 रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीन राणा प्रकरणी निर्णय दिलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा आणि  दिशाभूल करणारा दावा खोटा आहे. अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करून खोटी माहिती पसरवली जात आहे. हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकण्यारा आहे, तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्हा आहे, असे अतुल लोंढे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा – Govinda : कलावंताच्या अपमानाची परतफेड करावी लागेल; मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना इशारा

- Advertisement -

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत विजयी झाल्या. अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 2021 मध्ये रद्द ठरवत दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 28 फेब्रुवारी 2024 च्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे. असे असतानाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचे खोटे सांगून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -