जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मविआतील महिला नेत्या एकत्र, राज्यपालांची भेट घेणार

जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मविआतील महिला नेत्या एकत्र, राज्यपालांची भेट घेणार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी आघाडीतील महिला नेत्या एकत्र आल्या आहेत.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी महाविकास आघाडीतील महिला नेत्या एकत्र आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे, फिरोज खान, जया बच्चन यांच्यासह काही खासदार आणि महिला लोकप्रतिनिधी आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यपालांची भेट घेऊन काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत सविस्तर माहिती त्यांना देण्यात येणार आहे.

तसंच, जितेंद्र आव्हाडांविरोधात केलेल्या गुन्ह्याबाबत हायकोर्टात धाव घेणार असल्याचीही माहिती विद्या चव्हाण यांनी दिली.

रविवारी कळवा आणि ठाणे शहाराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा केल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीमाना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आव्हाडांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे.

First Published on: November 14, 2022 11:13 AM
Exit mobile version