उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही…; भगतसिंग कोश्यारींचा घणाघात

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही…; भगतसिंग कोश्यारींचा घणाघात

राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त झाल्यानंतर अनेक प्रकारचे गौप्यस्फोट करत आहेत. महाराष्ट्रातील राजकारण, १२ आमदारांच्या सहीबाबत आणि पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनी खुलासे केले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, असा घणाघात माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

भगतसिंग कोश्यारी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती, तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, अशी बोचरी टीका कोश्यारींनी ठाकरेंवर केली.

शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून काली उतरवलं आहे. त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं. मी त्यांना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीने जे करायचं ते केलं, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीवर आपली प्रतिक्रिया दिली. “मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे लिस्ट घेऊन आले होते. त्यावेळी मला त्यांनी सांगितले की, आम्ही बहुमत सिद्ध करू. त्यावर मी देखील म्हटलं ठीक आहे. कारण सर्वोच्च न्यायालयानुसार बहुमत हे राज्यपालांसमोर किंवा राष्ट्रपती यांच्यासमोर जाऊन सिद्ध केले जात नसून विधानसभेत बहुमत सिद्ध केले जाते. यातच दुसरे कोणी नव्हते. त्यामुळे मी म्हटले या शपथ घ्या आणि बहुमत सिद्ध करा. यात माझे कुठे चुकले? कोणी संविधान तज्ज्ञ असेल त्याने सांगावे”, अशी प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.


हेही वाचा : माझं काय चुकलं? पहाटेच्या शपथविधीवर भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया


 

First Published on: February 20, 2023 11:10 PM
Exit mobile version