करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोफत इंटरनेट?

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोफत इंटरनेट?

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोफत इंटरनेट?

करोना व्हायरसची महाराष्टात दुसरी स्टेज आहे. महाराष्टात सध्या करोना बाधितांची संख्या ५२ वर गेली आहे. गर्दीतुन करोनाचा व्हायरसचा फैलाव होतो. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ हा निर्णय आहे. सरकारी तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.  खासकरून आयटी आणि संगणकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर घरातून काम करणाऱ्यांना महिनाभर मोफत इंटरनेट सुविधा मिळावी असे आवाहन शिव केबल सेनेने केले आहे.

मोफत इंटरनेट देण्याचे आवाहन

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज फेसबुकद्वारे जनतेला संबोधित करत नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही शासनाने दिले. यामुळेच ज्यांना घरी राहून संगणकावर काम करणे शक्य आहे, अशा मुंबईकरांना महिन्याभरासाठी मोफत इंटरनेट देण्यात यावे असे आवाहन शिव केबल सेनेच्या माध्यमातून सर्व केबल चालकांना करण्यातआले आहे. नवे इंटरनेट कनेक्शन घेणाऱ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं घरी राहू शकतील. याची माहिती शिवकेबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी आहे.

First Published on: March 20, 2020 6:06 PM
Exit mobile version