अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; Login ID, Password मिळणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; Login ID, Password मिळणार

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आज, २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड देखील मिळणार आहे. तसेच येत्या १ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग १ भरता येणार आहे.

या विभागात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

राज्यातील मुंबई महानगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र, सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग १ भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग १ भरायचा होता. मात्र, आता हा अर्ज १ ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.

माध्यमिक शाळांचे प्रशिक्षण वर्ग

११ वी ऑनलाईन प्रवेशाबाबत कनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक केंद्र तसेच माध्यमिक शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. पण, अद्याप विद्यार्थी आणि पालकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय उपसंचांलकना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सखोल ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती दिलेल्या अधिकृत ठिकाणी मिळावी यासाठी दक्षता घ्यावी, असे संचालकांकडून सांगण्यात आले आहे.

अर्ज भरण्याचे वेळापत्रक

First Published on: July 26, 2020 12:39 PM
Exit mobile version