कुख्यात गुंडाची सुटका होताच मारणे टोळीचे शक्तीप्रदर्शन, काढली जंगी मिरवणूक

कुख्यात गुंडाची सुटका होताच मारणे टोळीचे शक्तीप्रदर्शन, काढली जंगी मिरवणूक

कुख्यात गुंडाची सुटका होताच मारणे टोळीचे शक्तीप्रदर्शन, काढली जंगी मिरवणूक

मारणे ग्रुपचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्त केले आहे. गजानन मारणेची तुरुंगातून निर्दोष मुक्त केल्यानंतर मारणेच्या समर्थकांनी थेट तळोजा कारागृहापासून त्याची मिरवणूक पुण्यापर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकीत तब्बल ३०० गाड्यांचा समावेश होता. मारणे ग्रुपच्या गाड्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. पुण्यात अमोल बधे आणि पप्पू गावडे यांचा ४ वर्षांपूर्वी गजानन मारणे याने खून केला. हा खून केल्यानंतर पुण्यात दहशतीचे वातावरण निर्माण करत होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याच्या कारवाईत गजानन मारणेला अटक केली. मागील ३ वर्षांपासून गजानन मारणेला तुरुंगात डांबून ठेवले होते.

अमोल बधेच्या खूनामध्ये आणि दहशतीचे सीसीटीव्ही पुरावे असूनही पोलिसांना गुन्हा सिद्ध करता आला नाही. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पकडलेले साक्षीदार खटल्याच्या सुनावणीत टिकू शकले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. परंतु मारणे टोळीने गजानन मारणे याची सुटका होताच पुन्हा दहशतीची झलक वाहनांची मिरवणूक काढून दाखवली आहे.

गजानन मारणेच्या टोळीने मिरवणूक काढून एक प्रकारे पुणे पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसत आहे. टोळीने काढलेल्या वाहनांच्या मिरवणुकीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. पुण्याचा भाई, तर पुणे शहरात रॉयल एन्ट्री असे स्टेटस ठेवण्यात आले आहेत. परंतु यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठा असा वाहनांचा ताफा गजानन मारणे टोळीचा गेला त्यावेळी वाहनांची वाहतूक कोंडीही झाली.

First Published on: February 16, 2021 12:15 PM
Exit mobile version