चाकरमानी-स्थानिकांना त्रास होणार नाही अशीच गणेशोत्सवासाठी नियमावली बनवणार – पालकमंत्री उदय सामंत

चाकरमानी-स्थानिकांना त्रास होणार नाही अशीच गणेशोत्सवासाठी नियमावली बनवणार – पालकमंत्री उदय सामंत

चाकरमानी-स्थानिकांना त्रास होणार नाही अशीच गणेशोत्सवासाठी नियमावली बनवणार - पालकमंत्री उदय सामंत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाला जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांसाठी नियमावली ठरवताना चाकरमान्यांना किंवा स्थानिक लोकांना त्रास होणार नाही अशीच नियमावली केली जाणार आहे तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत माहीती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते उपस्थित होते

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र, यावर्षी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना संदर्भात निर्बंध असणार आहेत. यामुळे चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो. तसंच स्थानिकांना देखील त्रास होतो. हा त्रास होणार नाही अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमावली बनविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून चाकरमानी आणि स्थानिक दोघांच्याही हिताचा विचार करून कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने नियमावली करण्यात येणार आहे, अस् उदय सामंत यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर कमी होवू लागला असून रॅपीड टेस्ट मध्ये ५ ते ६ टक्के पर्यमत आणि आरटीपीसीआरचा ७ ते ८ टक्के पॉझिटीव्हिटी दर आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. काही ठिकाणी अति गंभीर रुग्ण झाल्यावर सरकारी दवाखान्यात दाखल केले जातात, हे योग्य नसल्याचे सांगितले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत.

आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना मंजूरी

ज्या भागात आरोग्य सुविधा पोहचत नाही किंवा आरोग्य केंद्र दूर आहेत, याचा विचार करून आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे नव्याने निर्मितीसाठी प्रस्तावित होते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात सोवनडे हे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. तसेच नव्याने ११ उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यातील गोवेरी, माड्याचीवाडी, सावंतवाडी तालुक्यातील भोम-कोलगाव, सोनूर्ली, दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव, वझरे, घोटगेवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी नं २, पेंडूर, कांबळेवीर आणि कणकवली तालुक्यातील असलदे ही नव्याने उपकेंद्रे निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली आहेत. शासनाने ही मंजूरी दिली असून त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहितीही यावेळी पालकमंत्री सामंत यांनी दिली.

वेंगुर्ल्याच्या व्यासपीठावर युती ठरत नाही

वेंगुर्ला मच्छिमार्केटच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सेना-भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने सेना-भाजपा युती होणार असे म्हटले जाते, हे योग्य नाही, वेंगुर्ल्याच्या व्यासपीठावर युती ठरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणारे आहेत असे सांगत त्या कार्यक्रमात कोण काय बोलले हे माहीत नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

First Published on: July 15, 2021 5:43 PM
Exit mobile version