छोट्या पुढाऱ्यावर गौतमी पाटील संतापली; म्हणाली, “तुम्हाला फक्त मीच दिसते का?”

छोट्या पुढाऱ्यावर गौतमी पाटील संतापली; म्हणाली, “तुम्हाला फक्त मीच दिसते का?”

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील आणि तिच्याशी संबंधित वाद आता हे काही नवीन राहिले नाही. त्यामुळे काही लोकं तर आता उगाच तिच्या नावे प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि अशा अनेक घटना उघडकीस देखील आलेल्या आहेत. पण अशा लोकांचा आता चांगलाच समाचार घेण्याचे गौतमीने देखील ठरवले असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरूवातीला प्रसार माध्यमांना मुलाखत न देणारी गौतमी आता मात्र प्रसार माध्यमांसमोर बिनधास्तपणे येऊन आपले मत व्यक्त करताना दिसून येत आहे.

हेही वाचा – राज ठाकरेंनी खडसावले; ‘त्र्यंबक’ प्रकरणी गावकऱ्यांनी निर्णय घ्यावा, बाहेरच्यांनी…

पण यावेळी छोटा पुढारी नावाने प्रसिद्ध असलेल्या घनश्याम परब याने गौतमी पाटीलचा समाचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. घनश्याम दराडे याचा ‘मुसंडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने त्याने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पण यावेळी त्याने गौतमी पाटीलवर भाष्य करत तो म्हणाला की, “गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल. जी महाराष्ट्राची लावणी आहे त्या लावणीला लावणीचं राहू द्या. त्याला अश्लीलतेचा रंग चढवू नका अशी मी विनंती करतो. आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत आहे. गौतमी पाटीलच्या शो दरम्यान तरुणांच्या गटामध्ये हुल्लडबाजी होत असल्याची पाहायला मिळत असते त्यातून कार्यक्रमातदेखील गोंधळ निर्माण होऊन वाद होतात. यामुळे असा प्रकार बंद झाला पाहिजे.”

पण गौतमी पाटील हिने देखील आता छोट्या पुढाऱ्याच्या वक्तव्याचा खडसून समाचार घेतला आहे. छोट्या पुढाऱ्याच्या आरोपाला प्रत्युत्तर देत गौतमी म्हणाली की, “मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?,” असा प्रश्न देखील तिच्याकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी गौतमीच्या एका कार्यक्रमात चाहत्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. त्यामुळे ती चाहत्यांवर चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली. पत्रकारांना धक्काबुक्की होणं चुकीचंच आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी सोडून पुढं जातेय. हे सगळे बघत आहेत. मी असं काय केलंय? मी महाराष्ट्राचा बिहार केला काय? मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असे गौतमी पाटीलकडून यावेळी सांगण्यात आले. मला त्या गोष्टीची माहिती नव्हती. मी कार्यक्रमातून निघाले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मला कळलं. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असे आवाहनही तिने तिच्या चाहत्यांना केले आहे.

मात्र, हल्ली गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर सांगोल्यातील घेरडी गावात रासप नेत्याच्या कार्यक्रमाला गौतमी उशीरा पोहोचल्याने तिच्यावर आयोजकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: May 20, 2023 10:56 AM
Exit mobile version