खुशखबर! आता दररोज धावणार राजधानी एक्स्प्रेस

खुशखबर! आता दररोज धावणार राजधानी एक्स्प्रेस

मध्य रेल्वे मार्गवरील मुंबई ते दिल्ली येथे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १९ जानेवारीपासून मध्य रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली मध्य रेल्वेची राजधानी एक्सप्रेस ३० डिसेंबर २०२० पासून पुन्हा धावू लागली आहे.

यापूर्वी मध्य रेल्वेची राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून फक्त चार दिवस धावत होती. राजधानी विशेष गाडी (०१२२१) सीएसएमटीहून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दुपारी ४.१० वाजता सुटणार आहे. ही एक्सप्रेस सायंकाळी ६. ४५ वाजता नाशिक रोडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दिल्लीला पोहते. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झांसी आणि आग्रा कॅन्टोन्मेंट या स्थानकांवर थांबेल. ही विशेष गाडी (०१२२२) दर मंगळवार, गुरूवार, शनिवार आण रविवारी दिल्लीहून दुपारी ४.५५ ला रवाना होते आणि सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० ला पोहचते.

विशेष म्हणजे पुशपूल इंजिनमुळे मध्य रेल्वेची राजधानी एक्सप्रेसमुळे मुबंई ते नाशिक हे अंतर जवळपास अडीच तासांत पार करणे शक्य झाले आहे. आता प्रवाशांच्या मागणीनुसार आणि गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादाला बघता मध्य रेल्वेकडून राजधानी विशेष गाडी १९ जानेवारीपासून दररोज धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही राजधानी एक्स्प्रेस दररोज दुपारी ४ वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटणार असल्याची माहिती आहे.

First Published on: January 13, 2021 2:39 PM
Exit mobile version