उद्योजकाकडे मागितली २० लाखांची खंडणी

उद्योजकाकडे मागितली २० लाखांची खंडणी

प्रातिनिधिक फोटो

एका कारखानदाराला मोबाईल फोन वरून धमकावीत अज्ञात इसमाने २० लाखांची खंडणी मागितली, हे पैसे दिले नाही तर तुझ्या कुटुंबियांना ठार मारू अशी धमकी देऊन या खंडणीची मागणी करण्यात आली. खेळणी बनवणाऱ्याचा कारखाना असल्यामुळे या कारखानदाराकडून पैशाची मागणी केली जात होती.

कसा घडला प्रकार

अंबरनाथ (प) येथे शंकर हाईट्स या गृहसंकुलात राहणाऱ्या मोहम्मद नौशाद आलम (३३) यांचा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या “उद्योग विहार” येथे खेळणी बनविण्याचा कारखाना आहे. मोहम्मद यांना काही दिवसांपासून विविध मोबाईल नंबर वरून धमकीचे फोन येत आहेत त्यात त्यांना २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. हे पैसे दिले नाही तर मोहम्मद तसेच त्यांचा लहान भाऊ, वडील यांना ठार मारू अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मोहम्मद यांनी काल गुरुवारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश गायकर हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

First Published on: March 15, 2019 7:35 PM
Exit mobile version