राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वाद: राजभवनाकडून स्पष्टीकरण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वाद: राजभवनाकडून स्पष्टीकरण

राज्याचे राज्यपाल आज भगतसिंह कोश्यारी आज चार्टर्ड विमानाने उत्तराखंड दौऱ्यावर जाणार होते. मात्र राज्य सरकराकडून राज्यपालांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यासाठी चार्टर्ड विमान उपलब्ध होऊ शकले नाही. राज्य सरकारने या विमानासाठी परवानगी दिली नसल्याचे समोर आले. त्यामुळे गुरुवारी राज्यपालांना चार्टर्ड विमानातून खाली उतरण्याची वेळ आली. चार्टर्ड विमानाऐवजी राज्यपाल कमर्शीअल फ्टाईटमधून उत्तराखंड दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळते. या प्रकारावरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यातील वादाला भर पडली. अनेक राजकीय मंडळींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र राज्यपालांच्या उत्तराखंड दौऱ्यासाठी विमानाची व्यवस्था का झाली नाही यावर राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उत्तराखंडच्या मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकॅडमीच्या आयएसएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या प्रेरणा प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता. राज्यपाल कोश्यारी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. १२ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार होता. या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई सीएमआयएम विमानतळावरुवन डेहराडूनला रवाना होणार होते. उत्तराखंड दौऱ्याच्या तयारीच्या वेळी राज्यपाल सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्यपालांना सरकारी विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून २ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्र लिहिण्यात आले होते. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयालाही कळविण्यात आली होती. ११ फेब्रुवारी रोजी राज्यपाल १० वाजता सीएसआयएम विमानतळावर पोहचले. यावेळी त्यांना शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी नाही असे सांगण्यात आले, असे राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दुपारी १२:१५ वाजताच्या कमर्शीअल फ्टाईटमधून तातडीने उत्तराखंड दौऱ्यासाठी रवाना झाले.


हेही वाचा – राज्यपाल दौऱ्याला कसे मिळते ‘सरकारी’ विमान ? जाणून घ्या

First Published on: February 11, 2021 3:24 PM
Exit mobile version