गुरूपीठ ५० कोटींचा अपहार प्रकरण; अण्णासाहेब मोरेंच्या समर्थनार्थ सेवेकऱ्यांचा मोर्चा

गुरूपीठ ५० कोटींचा अपहार प्रकरण; अण्णासाहेब मोरेंच्या समर्थनार्थ सेवेकऱ्यांचा मोर्चा

 नाशिक : सेवेकरी अमर पाटील यांनी त्र्यंबकेश्वर गुरुपीठाचे श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णासाहेब गुरुमाऊली आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात तब्बल ५० कोटींचा अपहार केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. दरम्यान याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात असतानाच आज आमदार सीमा हिरेंसह काही लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि गुरुपीठाच्या सेवेकरयांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात भेट देत तक्रारदार असलेल्या अमर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच नाशिक पोलिस आयुक्त हेमंत नाईकनवरे यांनाही निवेदन दिले आहे.

दरम्यान, यावेळी अण्णासाहेब मोर यांची बदनामी झाली असून आमच्या भावना दुखावल्या गेल्याचे उपस्थितांनी म्हंटले आहे. आता या प्रकरणासंबंधी स्वत आमदार, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतल्याने आता सामान्य नागरिकांमध्ये या  प्रकरणाबाबत उत्कंठा अधिकच वाढणार असून आता पोलिस प्रशासन नेमकी के भूमिका घेते, या प्रकरणात खरंच कोण दोषी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की बदनामी केली म्हणून तक्रारदारांवरच कारवाई होणार हे बघणे महत्वाचे असेल.

आपलं महानगरने सर्वप्रथम फोडली वाचा 

याबाबत सर्वात आधी आपल महानगरने वृत्त प्रसारित करून प्रकरणाला वाचा फोडली होती. याबाबत दोन्ही बाजू समजून घेतल्या होत्या सोबतच याबाबत पोलिस प्रशासन आणि धर्मादाय आयुक्तालय यांचीही सविस्तर भूमिका समोर आणली होती.

First Published on: May 16, 2022 9:10 PM
Exit mobile version