Thackeray Group : शंकरराव चव्हाणांच्या पुत्राने काँग्रेसचा राजीनामा देणं म्हणजे…; ठाकरे गट संतप्त

Thackeray Group : शंकरराव चव्हाणांच्या पुत्राने काँग्रेसचा राजीनामा देणं म्हणजे…; ठाकरे गट संतप्त

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील राजकारणात आजचा दिवस म्हणजे काँग्रेससाठी मोठा धक्का मानल्या जात आहे. कारण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुत्राने राजीनामा काँग्रेसचा राजीनामा देणं म्हणजे मुलाने आईला नाकरण्यासारखं असल्याचे ते म्हणाले. (Thackeray Group Sankarrao Chavans son resigning from Congress means Thackeray group angry) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले खासदार संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत विचारले असते ते म्हणाले की, चव्हाणांनी राजीनामा दिला खरा मात्र, कुठे गेले हे स्पष्ट नाही. त्यावर एवढी खळबळ माजविण्याची गरज नाही. अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाचं पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं आहे. अशोक चव्हाण आज जे आहेत ते काँग्रेसमुळेच आहेत. भारतीय जनता पक्षानं त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं होतं. भारतीय जनता पक्षाला आदर्श घोटाळा पवित्र करुन घ्यायचा असेल सिंचन घोटाळ्याप्रमाणे ते आम्ही पाहू असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले. हेही वाचा : Ashok Chavan: दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार, पण…; चव्हाणांच्या मनात नेमके काय? पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, तरीही अशोक चव्हाणांवर आमचा विश्वास आहे. कालपर्यंत ते आमच्यासोबतच होते. महाविकास आघाडीच्या बैठकीला होते, जागा वाटपात त्यांनी सहभाग घेतला. मराठवाड्यातील काही जागांबाबत ते आग्रही होते. त्यामुळे अजूनही ते आमच्यासोबतच आहेत. अशी मी आशा बाळगतो. तरीही काहींना वाकडे पाऊलं टाकायचे असतील तर त्यांना कोण अडवणार. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणं आणि तेही शंकरराव चव्हाणांच्या पुत्राने असं करणं म्हणजे एका मुलाने आईला नाकारण्यासारखं असल्याचेही खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले. हेही वाचा : Maharashtra Politics : अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यासाठी गेले की, आणखी कशासाठी? ठाकरेंचा सवाल

दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करतो

राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, येत्या एक ते दोन दिवसांत मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, पण कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचंही विधान त्यांनी केलं आहे.

First Published on: February 12, 2024 3:55 PM
Exit mobile version