घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरMaharashtra Politics : अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यासाठी गेले की, आणखी कशासाठी? ठाकरेंचा...

Maharashtra Politics : अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यासाठी गेले की, आणखी कशासाठी? ठाकरेंचा सवाल

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत 10 ते 12 आमदारांचा गटही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लपवण्यासाठी गेले की आणखी कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बोलत होते.

हेही वाचा – Maharashtra Politics : काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत; ठाकरेंची टीका

- Advertisement -

अशोक चव्हाण यांचं मला आश्चर्य वाटतं. कालपर्यंत जागावाटपामध्ये भाग घेत होते. पण आज असं अचानक काय घडलं? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मला असं वाटतं की, त्यांना राज्सभेची जागा देत आहेत. म्हणजे प्रत्येकजण आपापलं बघतो आहे. मग माझ्या शेतकऱ्यांचं जे काही दु:ख आहे, ते कोण पाहणार? स्वत: घर, माझं करिअर, उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, तर मी पुढची सहा वर्ष मस्त राहीन. पण शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकडे जाऊन बघा, तो तुम्हाला काय शिव्या देत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबांचं कल्याण होत नाही. तर त्यांचं कुटुंब उघड्यावर पडतं. त्या शेतकऱ्याचे आई-वडील, बहीण-भाऊ, पत्नी आणि मुल-बाळं उघड्यावर पडतात. ही उघड्यावर पडलेली कुटुंब तुम्हाला उद्या जाब विचारणार आहेत की, 400 पार सोडा, कारण माझ्या घरातल्या कर्ता-करवित्याने आत्महत्या केली, त्याची भरपाई कोण करणार? जीव तर तुम्ही आणूच शकत नाही. मग काय म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार?

अशोक चव्हाण आज गेले, तर अशी चर्चा सुरू आहे की, त्यांचा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी किंवा आणखी कशासाठी गेले असतील. कारण अजित पवार यांच्यावर 70 हजार सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यावर ते तिकडे गेले. म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाही. पण भ्रष्ट्राचाऱ्यांना भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या. तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री करू, ही मोदी गॅरंटी आहे. ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -