‘हर घर तिरंगा’ अभियान; मंत्रालयात स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष

‘हर घर तिरंगा’ अभियान; मंत्रालयात स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष

यंदा भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या 75 वर्षानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत आज मंत्रालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. (har ghar tiranga independence day 2022 cm eknath shinde dcm devendra fadnavis maharashtra politics mantralaya vp96)

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात ‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तिरंग्यासह सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुख्यमंत्री देखील सर्वांच्या इच्छेला मान देत, प्रत्येकापाशी थांबत सेल्फी काढत होते. यावेळी त्रिमूर्ती प्रांगणातले सगळे वातावरण तिरंगामय झाले होते.

स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान देशभरात चालवले जात आहे. भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे. यासाठी मुंबई महापालिका घरोघरी तिरंगा ध्वजाच्या वितरण करत आहे.

स्वातंत्र्य लढ्यात मुंबईचे मोलाचे योगदान होते. अनेकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामुळे या स्वातंत्र्यवीरांचे योगदान लक्षात घेता महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला.

‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत महापालिकेने आतापर्यंत सुमारे 26 लाख ध्वजांचे वितरण केले आहे.


हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी मुंबई महापालिकेने खरेदी केलेले दीड लाख ध्वज सदोष

First Published on: August 11, 2022 4:28 PM
Exit mobile version