घरताज्या घडामोडी'हर घर तिरंगा' अभियानासाठी मुंबई महापालिकेने खरेदी केलेले दीड लाख ध्वज सदोष

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी मुंबई महापालिकेने खरेदी केलेले दीड लाख ध्वज सदोष

Subscribe

यंदा भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या 75 वर्षानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गंत मुंबई महापालिकाही घरोघरी तिरंगा ध्वजाच्या वितरण केले जात आहे.

यंदा भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या 75 वर्षानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गंत मुंबई महापालिकाही घरोघरी तिरंगा ध्वजाच्या वितरण केले जात आहे. यासाठी महापालिकेने 35 लाख ध्वजांच्या खरेदी केले आहेत. मात्र, महापालिकेने खरेदी केलेल्या ध्वजांपैकी तब्बल दीड लाख ध्वज सदोष आढळल्याची माहिती समोर येत आहे. (Independence day defective flags bmc taking special care)

मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांना पाठवलेल्या राष्ट्रध्वजांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यामध्ये सदोष ध्वज आढळून आले आहेत. हे सदोष ध्वज पुन्हा कंत्राटदारांकडे पाठवून ते पुन्हा बदलून घेण्यात येत आहेत. भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्य लढ्यात मुंबईचे मोलाचे योगदान होते. अनेकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामुळे या स्वातंत्र्यवीरांचे योगदान लक्षात घेता महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला.

‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत महापालिकेने आतापर्यंत सुमारे 26 लाख ध्वजांचे वितरण केले आहे. तर सदोष असलेले दीड लाख ध्वज पुन्हा एकदा खरेदी केलेल्या कंपनीकडे पाठवून दिले असून, बदलून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

- Advertisement -

दीड लाख सदोष असलेले ध्वज बदलून नवीन देण्यात येत असून, हे नवीन ध्वजही रविवारपर्यंत महापालिकेला प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, सदोष ध्वज जनतेच्या हाती जाऊ नये यासाठी महापालिका काळजी घेत आहे.

सदोष ध्वज कसे होते

  • ध्वजाचा आकार कमी जास्त असणे.
  • ध्वजाच्या मधोमध असणारे अशोक चक्र एका बाजूला असणे.
  • ध्वजाला छिद्र असणे.

हेही वाचा – राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -