ठाण्यात पावसाची जोरदार बॅटींग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

ठाण्यात पावसाची जोरदार बॅटींग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अतिवृष्टी होत आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत अतिवृष्टी होत असल्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटं उशीराने सुरू आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे सुद्धा पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठाण्यात मध्य रेल्वेची वाहतूक सध्या ५ ते १० मिनिटं उशीराने सुरू आहे. काल पासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे ठाणे शहरातील काही भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे स्टेशनजवळील काही भाग आणि वंदना डेपोजवळील काही भागांत पाणी भरायला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील २.३ तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह ठाण्यात पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाने जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार बॅटिंग केली. पण सध्या मात्र पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली आहे.

मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे.


हेही वाचा : शिंदे गटात गेल्याने शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंची हकालपट्टी, सेनेला फटका


 

First Published on: July 13, 2022 10:31 AM
Exit mobile version