वादळानंतर राज्यात पावसाची दमदार हजेरी

वादळानंतर राज्यात पावसाची दमदार हजेरी

वादळानंतर राज्यात पावसाची दमदार हजेरी

एककडे पश्चिम किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आज राज्यात विविध ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नागपूर, पालघर याठिकाणी पावसाने पहाटे पासूनच जोर धरला आहे. तर नागपूरात २४. ६ मिमी पावसाची नोंद झाली असून येत्या ६ जूनपर्यंत शहरात पावसाळी वातावरण राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पालघरमध्ये तुफान पाऊस

दरम्यान, पालघरमध्ये देखील वादळानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटामुळे लोकांची झोपदेखील उडाली आहे.

बदलापूरमध्ये लावली पावसाने हजेरी

मुंबई शहरात देखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर बऱ्याच ठिकाणी ऊन – पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. तर दादर, माटुंगा भागात पावसाने आज रजा घेतल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे गोरेगाव आणि बदलापूरमध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह सध्या बदलापूरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.

विदर्भातील पाऊस

हवामान खात्यानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे दक्षिण – मान्सूनचा वेग मंदावू शकतो. परंतु, मान्सूपूर्व हालचाली विदर्भासाठी अनुकूल दिसून येत आहेत. पुढील दोन दिवसांत नागपूरसह विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि वाशिम वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

First Published on: June 4, 2020 9:18 AM
Exit mobile version