घरमुंबईमुंबई रेड अलर्टवरच

मुंबई रेड अलर्टवरच

Subscribe

मुंबईला असलेला निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी मुंबईत रेडअलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. आगामी चोवीस तासात मुंबईसह ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

निसर्ग चक्रीवादळाचे संकट पुढच्या गुरुवारपर्यंत दूर होईल. हळूहळू वादळाची तीव्रता कमी होत असून उद्यापर्यंत ते पूर्णपणे क्षमलेले असेल. बुधवारी संध्याकाळी 23 किमी वेगाने वादळ पुणे, नाशिकच्या दिशेने सरकत होते.वार्‍याचा वेग 100 किमी ते 110 किमी प्रति तास होता. मात्र गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेने दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकले. मात्र मुंबईवरचे संकट टळलं आहे. चक्रीवादळ रायगडमधून अलिबाग, पेण, पनवेल मार्गे ठाण्याच्या दिशेने नाशिककडे वळले.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असला तरी पावसाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. या व्यतिरिक्त देखील जिथे आवश्यक आहे, तिथे प्रशासन देखील मदत करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -