मुंबई, पुण्यासह राज्यात परतीच्या पावसाचं थैमानं, शेतीला मोठ्या प्रमाणात फटका

मुंबई, पुण्यासह राज्यात परतीच्या पावसाचं थैमानं, शेतीला मोठ्या प्रमाणात फटका

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील काही महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर गाव-खेड्यातही काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसामुळे अनेक महत्त्वाची धरणंही भरली आहेत. परंतु पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सायंकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुख्य म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाने तडाखा दिला. दुसरीकडे पुणे शहरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवली साळीस्ते येथील घरावर वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे.

ठाण्यात दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली. शहरामध्ये तासभरात २०.०७ मिमी इतकी पाऊस झाला असून कळवा-खारेगाव परिसरातील दत्तवाडीत पाणी साचले होते. तर दिव्यात झाड पडल्याची घटना समोर आली आहे. हा पाऊस सुरुवातीला होणारा आहे की परतीचा अशी आता चर्चा रंगू लागली आहे.

बीडमधील आष्टी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला होता. या परिसरातील चार हजार कोंबड्या पावसामध्ये वाहून गेल्या आहेत. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरु करण्यात आली. अनेक वाहन धारकांना या पाण्यातून मार्ग काढताना पाण्याचा प्रचंड सामना करावा लागला. तसेच जिल्हाभरात सोयाबिन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.


हेही वाचा : ‘तो’ पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो, इस्लामपुरातील घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल


 

First Published on: October 14, 2022 9:39 PM
Exit mobile version