कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दि. 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतीतास वेगाने वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर दि. 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र – गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर आज दि. 4 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मुंबईत सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात – २१ मिमी, पूर्व उपनगरात – १७ मिमी तर पश्चिम उपनगरात – २५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई शहर भागातील वरळी, प्रभादेवी येथे २२ मिमी, परळ -२० मिमी, मुंबई सेंट्रल , हाजीअली – १९ मिमी, मलबार हिल – १७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात – विक्रोळी – १७ मिमी इतक्या पावसाची तर पश्चिम उपनगरात – वांद्रे – सांताक्रूझ -१८ मिमी, खार – २० मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा : हे सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलंय – मुख्यमंत्री एकनाथ


 

First Published on: July 4, 2022 9:14 PM
Exit mobile version