श्रीवर्धनमध्ये आढळलेल्या बोटीच्या घटनेने मुंबईत नाकाबंदी; महाराष्ट्रात हायअलर्ट

श्रीवर्धनमध्ये आढळलेल्या बोटीच्या घटनेने मुंबईत नाकाबंदी; महाराष्ट्रात हायअलर्ट

रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील हरीहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. सध्या पोलीस या संशयास्पद बोटीबाबत तपास करत आहेत. परंतु या घटनेमुळे मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. (high alert issued in Maharashtra suspicious boat was found near harihareshwar beach with weapons)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, या बोटीच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. तसेच, ही बोट ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या हाना लॉंडर्न्स गन यांच्या मालकीची आहे. लेडी हार्न असे या बोटीचे नाव आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

राज्यात समुद्र किनारी जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून मुंबईतही ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यात त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन प्रशासनाने दिले आहे.

कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून, पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्याची गुप्तचर यंत्रणा केंद्राशी समन्वय साधत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला जी मदत हवी ती, केंद्राकडून पुरवली जात आहे. राज्याकडून केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा – श्रीवर्धनमध्ये एके-47 सह आढळलेली संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेची; विधानसभेत फडणवीसांची माहिती

First Published on: August 18, 2022 4:43 PM
Exit mobile version