संजय राऊतांच्या डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल; गिरीश महाजनांचा पलटवार

संजय राऊतांच्या डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल; गिरीश महाजनांचा पलटवार

‘संजय राऊत यांच्या डोळ्याचे मला वाटते ऑपरेशन करावे लागले. मोतीबिंदू जशा येतो ना तसा त्यांच्या डोळ्यावर कोणतातरी बिंदू आलेला आहे. तो बिंदू हिंदुत्वविरोधा दिसतोय’, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. ‘महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चा जर निघाला असेल तर, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान आहे’, असे संजय राऊत म्हणाले होते, त्यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. (Hindu Janakrosh Morcha BJP Leader Girish Mahajan Slams Thackeray Group MP Sanjay Raut)

सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बातचित करताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. “संजय राऊत यांच्या डोळ्याचे मला वाटते ऑपरेशन करावे लागले. मोतीबिंदू जशा येतो ना तसा त्यांच्या डोळ्यावर कोणतातरी बिंदू आलेला आहे. तो बिंदू हिंदुत्वविरोधा दिसतोय. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं संजय राऊत काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यासोबत फिरत होते. आता सध्या राऊतांनी हिदुत्वाशी फारकत घेतली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदुत्वापासून फार फारकत घेतलेली दिसते आहे. त्यांना कादाचित हिंदू शब्दांची सुद्धा एलर्जी झाल्यासारखी दिसते. त्यामुळे ते नैराश्याने बोलत आणि वक्तव्य करत आहेत”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी राऊतांवर पलटवार केला.

अनावधानाने आलेले शब्द आहेत – गिरीश महाजन

काल जो मोर्चेकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला होता. तेव्हा या मोर्चेकऱ्यांचा आवाज का बंद होता? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावरही गिरीश महाजन यांनी टीकास्त्र सोडले. “राउतांच्या या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. आतापर्यंत अनेक लोकांच्या तोंडून शब्द निघालेले आहेत. त्यावेळी काही अवमान झालेला नाही, तर बोलताना काही गोष्टींचे उदाहरण देताना बोलल्या गेलेल्या आहेत. खरं म्हणजे त्यांचे समर्थन कोणीही केलेले नाही, भाजपानेही केलेले नाही. अनावधानाने आलेले शब्द आहेत. परंतु, सतत मागच्या गोष्टी घेऊन बोलायचं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना आदर आहे. तसेच, भाजपाबद्दल तुम्ही बोलूच नका, आम्हाला महापुरुषांबाबत किती आदर आहे, हे आम्हाला माहित आहे. परंतु, एखादा शब्द पकडायचा आणि तुम्हाला याच्याविषयी आदर नाही, असे सांगायचं. पण स्वत: मात्र हिदुत्वादीबाबत फारकत घेऊन कोणाबरोबर आपण गळ्यात गळे घालून फिरतोय याची आपल्याला कल्पना आहे. वेळेप्रसंगी तुम्ही एमआयएमच्याही मांडीवर जाऊन बसलेले आहात. राज्यसभा आणि विधानसभेच्या वेळेला तुम्ही त्यांना किती मस्का मारला हे सगळ्यांनीच पाहिलं आहे”, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

त्याशिवाय, “हिंदुत्वाबद्दल तुम्हाला आता बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यांचेकडे आमदार आणि खासदार राहिलेले नाहीत. तसेच, त्यांच्याकडे जे शिवसैनिक आहेत ते देखील त्यांच्याकडे राहिले नाही. ते सगळेजण बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत”, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.


हेही वाचा – हिंदू जनआक्रोश मोर्चा म्हणजे मोदी-शाहांना आव्हान – संजय राऊत

First Published on: January 30, 2023 3:25 PM
Exit mobile version