घरताज्या घडामोडीहिंदू जनआक्रोश मोर्चा म्हणजे मोदी-शाहांना आव्हान - संजय राऊत

हिंदू जनआक्रोश मोर्चा म्हणजे मोदी-शाहांना आव्हान – संजय राऊत

Subscribe

'महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चा जर निघाला असेल तर, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान आहे', अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

‘महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चा जर निघाला असेल तर, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान आहे’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच, ‘केद्रात गेल्या 8 वर्षांपासून यांचे सरकार असून दोघेही प्रभळ शक्तीशाली नेते आहे. तरीही धर्मातर होत असतील, भाजपा सांगतेय तसे लव्ह जिहाद सारख्या घटना घडत असतील तर हे त्या सरकारचे अपयश आहे’, असेही संजय राऊत यांनी म्हटले. (Hindu Janakrosh Morcha is a challenge to pm narendra modi and amit shah says sanjay raut)

खासदार संजय राऊत यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात निघालेल्या जनआक्रोश मोर्चावरून भाजपावर हल्लाबोल केला. “कालची रॅली भाजपाचीच होती, जनआक्रोश मोर्चा असे काही नव्हते. काल जो मोर्चा काढण्यात आला. तो कोणी आणि कशासाठी काढला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कालच्या मोर्च्याकडे पाहता भारतीय जनता पार्टीच महाराष्ट्र युनीट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला असावा, असे मला वाटले. महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चा जर निघाला असेल तर, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान आहे. कारण पंतप्रधान मोद, अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे नेते स्वत:ला कडवट हिंदूत्ववादी म्हणवून घेणारे आहेत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

- Advertisement -

पुढे संजय राऊत म्हणाले की, “दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचे राज्य आणि सरकार आहे. केद्रात गेल्या 8 वर्षांपासून यांचे सरकार असून दोघेही प्रभळ शक्तीशाली नेते आहे. तरीही धर्मातर होत असतील, भाजपा सांगतेय तसे लव्ह जिहाद सारख्या घटना घडत असतील तर हे त्या सरकारचे अपयश आहे. म्हणूनच ते बहुतेक न्याय मागण्यासाठी शिवसेना भवनासमोर अत्यंत व्यतिथ मनाने जमलेले दिसतात”.

“खरं तर हिंदुंचा मोर्चा काय असतो, हे पाहायाचे असेल तर, या मोर्चेकऱ्यांनी कश्मीरला जाऊन हिंदू पंडितांचा आक्रोश पाहायला हवा. आजही हजारो कश्मीरी पंडित जम्मूच्या रस्त्यांवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करताहेत आणि संघर्ष करता आहेत”, असेही राऊत म्हणाले.

- Advertisement -

“काल जो मोर्चेकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला होता. तेव्हा या मोर्चेकऱ्यांचा आवाज का बंद होता? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच, जिथे शिवाजी महाराजांचा अपमान होतो, तेथे यांचा जनआक्रोश मोर्चा चालत नाही. कश्मीरच्याबाबतीत हिंदू आक्रोश नाही, रामभक्तांवर गोळ्या चालवणाऱ्या मुलायमसिंग यादव यांना मोदींचे हिदुत्ववादी सरकार पद्मविभुषण हा किताब देते आणि त्यांचा गौरव करते. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान नाही. या सगळ्या मुद्द्यांवर हा हिंदू आक्रोश मोर्चा काढला असेल. त्यामुळे हा जो हिंदू आक्रोश मोर्चा निघाला, हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेच्या विरोधात निघाला त्याबद्दल मी मोर्चेकऱ्यांचे अभिनंदन करतो”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, उद्या सादर होणार आर्थिक सर्वेक्षण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -