कुणीही पत्र दिलं आणि म्हटलं मला सुरक्षा द्या तर.., राज ठाकरेंच्या सुरक्षेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

कुणीही पत्र दिलं आणि म्हटलं मला सुरक्षा द्या तर.., राज ठाकरेंच्या सुरक्षेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारला पत्र दिलं असेल तर त्या पत्रावर योग्य तो निर्णय होईल. प्रत्येकाने कुणीही पत्र दिलं आणि म्हटलं मला सुरक्षा द्या तर लगेच अशी सुरक्षा देता येत नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरेंच्या सुरक्षेवर बोलताना वळसे पाटील म्हणाले, त्यांच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. राज्य सरकारला पत्र दिलं असेल तर त्या पत्रावर योग्य तो निर्णय होईल. प्रत्येकाने कुणीही पत्र दिलं आणि म्हटलं मला सुरक्षा द्या तर लगेच अशी सुरक्षा देता येत नाही. काही प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण करुन देता येते, असं वळसे पाटील म्हणाले.

दोषी व्यक्तींना केंद्र सुरक्षा पुरवतंय

राज्यामध्ये अलिकडे सार्वभौम राज्याच्या अधिकाराला बाजूला सारून काही दोषी व्यक्तींना अशा प्रकारे केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते. गंमतीदार गोष्ट आहे. मला वाटतं हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. राज्य सरकार पूर्णपणे सक्षम आहे, राज्यातील जनतेचं रक्षण करायला. ठिक आहे, केंद्र सरकारचा अधिकार आहे. पण त्या सुरक्षेचा वापर कशाप्रकारे कराया ते त्यांनी ठरवावं, असं वळसे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे. कुठल्याही प्रकारे अशांततेचं वातावरण निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. जे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर कडक कारवाी करु, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांच्यावर कडक कारवाई करणार – गृहमंत्री


 

First Published on: April 19, 2022 11:02 AM
Exit mobile version