महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहिर करा – आ. प्रकाश गजभिये

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहिर करा – आ. प्रकाश गजभिये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबरला राज्य सरकारने सुट्टी जाहिर करावी, अशी मागणी औचित्याच्या मुद्दयाव्दारे विधानपरिषद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. यावर मा. सभापती यांनी शासनाने त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत आहे. महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनूयायी महामानवच्या दर्शनासाठी जातात.

या कारणासाठी सुट्टी हवी

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरीता चैत्यभूमी येथे राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून लाखो आंबेडकरी अनुयायी येतात. संपूर्ण राज्यात महापरिनिर्वाण दिनी अभिवादन सभा, आदींकार्यक्रम घेण्यात येतात. ६ डिसेेंबर रोजी चैत्यभूमी(मुंबई), दीक्षाभूमी(नागपूर), शांतीवन (चिंचोली नागपूर), राजगृह (दादर, मंबई) आदींठिकाणी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरीता येतात. मात्र ६ डिसेंबर रोजी सर्व सरकारी कार्यालये व खाजगी आस्थापनांची कार्यालये सुरू असल्याने या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या लाखो अधिकारी- कर्मचारी यांना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. ६ डिसेंबरला सुट्टी जाहिर करावी अशी अनु. जाती/जमाती, वि.जा.-भ.ज./इ.मा.व./वि.मा.प्र./शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच राज्यातील अनेक संघटनांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेता शासनाने त्वरीत दखल घेवून 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहिर करावी, अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी सभागृहात केली.

First Published on: November 29, 2018 3:31 PM
Exit mobile version