त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे  गृहमंत्र्यांचे आवाहन

त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. तसेच पोलीसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


हेही वाचा – त्रिपुरातील घटनेचे राज्यात पडसाद, मालेगावात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

First Published on: November 12, 2021 8:46 PM
Exit mobile version