HSC Result 2021: यंदाच्या बारावीच्या परीक्षेत ४,७८९ विद्यार्थी नापास

HSC Result 2021: यंदाच्या बारावीच्या परीक्षेत ४,७८९ विद्यार्थी नापास

यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी (HSC Exam) एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांपैकी मूल्यांकन प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ लाख १९ हजार ७५४ इतकी आहे. मूल्यांकनानंतर बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ लाख १४ हजार ९६५ इतकी आहे. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी ९९.६३ आहे. तर यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण ४,७८९ विद्यार्थी नापास झाल्याची आकडेवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पुणे यांनी जाहीर केली आहे. (HSC Result 2021: 4,789 students failed in this year’s 12th standard examination)  राज्यातील ९ मंडळांचा हा एकत्रित निकाल आहे.

पुनर्परिक्षार्थी (Repeater Candidates) विद्यार्थांचा निकाल ९४.३१ टक्के

यंदाच्या बारावी परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातून आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळाधून विज्ञान, कला,वाणिज्य आणि एचएससी व्होकेशनल या शाखेतील पुनर्परिक्षार्थी विद्यार्थाचा निकाल ९४.३१ टक्के इतका लागला आहे. पुनर्परिक्षेसाठी ६६,८७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६६,८६७ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले. त्यातील ६३,०६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

राज्याचा शाखानिहाय निकाल

राज्यात विज्ञान,कला,वाणिज्य, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेतून विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा विज्ञान शाखेसाठी ५ लाख ४४ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील सर्वच विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के लागला असून ५ लाख ४१ हजार ८०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर कला विभागात यंदा ३ लाख ७६ हजार ४१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले. कला विभागाचा निकाल ९९.८३ टक्के लागला असून ३ लाख ७५ हजार ७९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वाणिज्य विभागात यंदा ३ लाख ४९ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांनी मूल्यांकन प्राप्त झाले. वाणिज्य विभागाचा निकाल ९९.९१ टक्के लागला असून ३ लाख ४९ हजार ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर यंदा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागात सर्वात कमी ४८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील सर्व विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले. या विभागाचा निकाल ९८.८० टक्के लागला असून ४८ हजार ३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण होणार

बारावीच्या निकालाबाबतत विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सुविधा उपलब्ध करण्यात आली असून तक्रार निवारण अधिकारी म्हणून संबंधित विभागीय मंडळातील सहसचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यपद्धतीचा तपशील हा मंडळाच्या अधिकृत वेबसाइटर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


हेही वाचा – HSC Result 2021: यंदाही मुलींचीच बाजी, १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के

First Published on: August 3, 2021 3:45 PM
Exit mobile version