#Live : कोरेगाव-भिमा येथे विजयस्तंभावर मोठी गर्दी!

#Live : कोरेगाव-भिमा येथे विजयस्तंभावर मोठी गर्दी!
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरेगाव-भिमामधील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने दलित बांधव जमा होत आहेत. सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभावर जाऊन दर्शन घेतलं. ‘पोलिसांनी अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये’, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तर, ‘यंदाही काही समाजविघातक प्रवृत्तींकडून इथे गोंधळ घडवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आम्ही तो सरकारच्या सोबतीने हाणून पाडला आहे’, अशी प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
Pravin Wadnere

सोशल मीडियावर पोलिसांची नजर!

कोरेगाव-भिमामध्ये पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. ७४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट पसरवणाऱ्यांवर देखील पोलिसांचे लक्ष आहे. सोशल मीडियावरून असे कृत्य करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी २५० हून अधिक व्हॉटसअॅप ग्रुपच्या अॅडमिनला याआधीच नोटिस बजावण्यात आली आहे.

Pravin Wadnere

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी!

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होत आहे. यावेळी नेतेमंडळींसह आमदार आणि खासदार सुद्धा दिवसभर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

Pravin Wadnere

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1212210467461976064

First Published on: January 1, 2020 9:17 AM
Exit mobile version