ब्रँडेड कुंकूवासाठी पतीने मोडले लग्न!

ब्रँडेड कुंकूवासाठी पतीने मोडले लग्न!

ब्रँडेड कुंकूवासाठी पतीने मोडले लग्न!

साखरपुड्याच्या दिवशी ब्रँडेड कुंकू का नाही वापरले नाही, या वादातून श्रीमंतीत वाढलेल्या नवऱ्या मुलागा आणि त्याच्या कुटुंबियांकडून लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील वाडा येथे घडला. वाडा पोलिसांनी विचित्र मागणी वरून लग्न मोडणाऱ्या नवऱ्या मुलासह चार जणांविरुद्ध गुरुवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या विचित्र मागणीमुळे लग्न मोडले याची चर्चा गुरुवारी दिवसभर वाड्यात रंगली होती. नीरज पाटील, सुधाकर पाटील (वडील), नयना पाटील (आई), कमलाकर पाटील (काका) असे लग्न मोडणाऱ्या नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असणारे सुदाम उर्फ सुधाकर विठ्ठल पाटील, सध्या मुक्काम वसई यांनी त्यांच्या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका सुसंस्कृत कुटुंबातील उच्चशिक्षित मुलीबरोबर ठरवले होते. हे लग्न जमण्यासाठी सदर मुलाचे काका व महसूल विभागात असणारे कमलाकर विठ्ठल पाटील त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर ३० ते ४० लोकांच्या उपस्थितीत टीळा (कुंकू) लावण्याचा अर्थात सुपारीचा करण्याचा कार्यक्रम पार पडला होता. हा कार्यक्रमात मुलीच्या वडिलांकडून मुलाचे आणि त्याच्या कुटुंबाचा आदरसत्कार करून सर्वाना ब्रँडेड कपडे भेट म्हणून दिले होते. जेवणास बेत आखण्यात आला होता सर्वकाही व्यवस्थित पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाला व त्याच्या काकांना विचारणा केली.

मात्र नवऱ्या मुलाने हि सोयरीक जमणार नाही म्हणून चक्क लग्नाला नकार दिला. हे एकूण मुलीच्या वडिलांना धक्काच बसला , त्यांनी लगान मोडण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, लग्न जमवण्यासाठी पुढाकार घेणारे मुलाचे काका यांना फोन केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सर्व काही सुरळीत पार पडत असताना मुलाने लग्नाला नकार का दिला म्हणून मुलीकडील मंडळी विचारात पडली. या प्रकारामुळे मुलीकडील कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आले, त्यांनी अखेर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात येण्यासाठी निरोप पाठवला. नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंब पोलीस ठाण्यात येताच त्यांनी पोलिसांनी त्यांना लग्न मोडण्याचे कारण विचारताच त्याचे उत्तर एकूण पोलीस देखील गोंधळात पडले. टिळा लावण्याचा कार्यक्रमाच्या वेळी मुलीच्या कुटुंबीयांनी वापरलेले कुंकू हे ब्रँडेड नव्हते, ते हलक्या दर्जाचे होते आणि मुलीची आई माझ्या सोबत एकही शब्द बोलली नाही म्हणून आम्ही लग्न मोडत आहोत असे नवरा मुलाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीमंतीचा माज असणाऱ्या या कुटुंबीयांनी पोलिसांचे देखील काही एकूण घेतले नाही. अखेर पोलिसांनी मुलीच्या वडिलांची तक्रार दाखल करून नवरा मुलगा, त्याचे आई वडील आणि काका यांच्याविरुद्ध भादंवि. कलम ४२०, ४१७, आणि ५००,३४ सह अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरु असल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड यांनी दिली.


हेही वाचा- संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर


 

First Published on: March 4, 2021 8:51 PM
Exit mobile version