घरताज्या घडामोडीसंजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Subscribe

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी आपला वनमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. मात्र चार दिवस उलटूनही संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे गेल्या नसल्याने विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात होती. मात्र आज राज्यपालांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पण तो अद्याप राज्यपालांना पाठवला नसल्याचा आरोप केला होता. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही करुन अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर राठोड यांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मात्र या राजीनाम्यावर अद्याप सही केली नसल्याचा आरोप भाजपने केला होता. फ्रेम करण्यासाठी राजीनामा घेण्यात आला आहे, अशी टीका भाजपने केली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधक सरकारला घेरणार होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर सही केल्यानंतर आज राज्यपालांनीही त्यावर सही केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा- राज्यात १ एप्रिलपासून नवीन विजेचे दर लागू, कोणाची वीज स्वस्त, कोणाची महाग ?

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -