मी मविआच्याच उमेदवारांना मते दिली; संजय राऊतांच्या आरोपानंतर अपक्ष आमदाराचे स्पष्टीकरण

मी मविआच्याच उमेदवारांना मते दिली; संजय राऊतांच्या आरोपानंतर अपक्ष आमदाराचे स्पष्टीकरण

राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठं राजकीय नाट्य रंगलं. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर निशाणा साधला. त्यांनी दगाबाज आमदारांची नावे जाहीर केल्याने राज्यात खळबळ माजली. मात्र, या आरोपांवर लोहा कंधार मतदारसंघाचे शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी खंडन केलं असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही मतदान केल्याचा दावा त्यांनी केलाय. (I voted for MVA’s candidates; Independent MLA’s explanation after Sanjay Raut’s allegation)

हेही वाचा आमच्या हातात ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील – संजय राऊत

श्यामसुंदर शिंदे म्हणाले की, ‘मी राष्ट्रवादीचा सहयोगी आमदार असून महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनाच मी मते दिली. धृतराष्ट्रांना ज्याप्रमाणे संजय कुरुक्षेत्र लढाईची माहिती देत होते, त्याप्रमाणे संजय राऊतांना सर्व माहिती होत असेल.

हेही वाचा – लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होणार; राज्यसभेच्या निकालावरून नाना पटोलेंचा इशारा

ते पुढे म्हणाले की, राजकारण माझा धंदा नाही. त्यामुळे टीकेने मला काही फरक पडत नाही.

संजय राऊत यांनी सहा आमदारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे आमदार संजयमामा शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनीही स्पष्टीकरण देत त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे.

First Published on: June 12, 2022 11:09 AM
Exit mobile version