लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होणार; राज्यसभेच्या निकालावरून नाना पटोलेंचा इशारा

भाजपला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लागणारी अतिरिक्त मते मिळवण्यासाठी नेमकी मदत कोणी केली, असा प्रश्न उपस्थित होत असताना याबाबत लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होणार, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. भाजपला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लागणारी अतिरिक्त मते मिळवण्यासाठी नेमकी मदत कोणी केली, असा प्रश्न उपस्थित होत असताना याबाबत लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होणार, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. त्यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. (Nana Patole’s warning to bjp from Rajya Sabha result)

हेही वाचा – भाजपने मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवत केला संप्रदायाचा अवमान…

१७२ आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता. त्यापैकी १६९ आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र, संजय पवार २ मतांनी हरले. त्यामुळे राज्यसभेसाठी कुठे चूक झाली हे तपासलं पाहिजे असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, गांधी कुटुंबाला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. यावरून बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या गांधी कुटुंबाने काम केलं त्या कुटुंबाला ईडीने नोटीस पाठवून त्यांना बदनाम करण्याचं काम केलंय. मात्र, आम्ही सारे गांधी कुटुंबाच्या पाठिशी उभे राहणार आहोत. कारण, ईडी हे भाजपचं ब्रम्ह्रास्त्र झालं आहे.

हेही वाचा अपक्षांना घोडा म्हणाले म्हणून ते भाजपसोबत आले- देवेंद्र फडणवीस

तसेच, यावेळी त्यांनी नुपूर शर्मा प्रकरणावरूनही भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले की, भाजपचेच काही नेते नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहेत. त्यांच्यामुळे देशाची जगभरात नाचक्की झाली. पंतप्रधानांचा फोटो आखाती देशात कचरा कुंडीवर लावण्यात आला. पंतप्रधानांचा अपमान हा देशाच अपमान असतो, असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचं नाव पुढे येत आहे. त्यासाठी काँग्रेसचा पवारांना पाठिंबा असेल असं मतही नाना पटोले यांनी व्यक्त केलं.