तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता नागपूरच्या आयुक्तपदाची जबाबदारी!

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता नागपूरच्या आयुक्तपदाची जबाबदारी!

तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली

आपल्या कामाच्या पद्धतीमुळे कायम चर्चेत आणि त्याहून जास्त वेळा वादात असणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक असलेल्या मुंढेंची आता नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. महाविकासआघाडीचं नवीन सरकार आल्यानंतर सरकारने भाजपचा गड असलेल्या नागपूरमध्ये तुकाराम मुंढेंसारख्या शिस्तप्रिय आणि कडक अधिकाऱ्याची बदली केल्यामुळे भाजपसाठी ही अडचणीची बाब ठरणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याआधी नवी मुंबई आणि नाशिकचे आयुक्त असताना तुकाराम मुंढेंच्या कारभाराला कंटाळून तिथल्या लोकप्रतिनिधिंनी त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याआधी पिंपरी-चिंचवड आणि बीडचे आयुक्त असताना देखील त्यांच्या कडक शिस्तीचा फटका लोकप्रतिनिधींना बसला होता.


वाचा सविस्तर – तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! नक्की चाललंय तरी काय?

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्यासोबतच इतरही काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत.

१) संपदा मेहता यांची विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

२) रणजीससिंग देओल यांची एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

३) एस. एन. गायकवाड यांची साखर विभागाचे आयुक्तपदावरून पुणे महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

४) सौरभ राव यांची पुणे महापालिकेचे आयुक्तपदावरून साखर विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

५) प्राजक्ता लवंगारे यांची बदली मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून करण्यात आली आहे.

६) के. बी. उमप यांच्यावर एक्साईज विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे.

७) आनंद रायते यांच्यावर अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त म्हणून पदभार सोपवला आहे.

८) ए. एम. कवाडे यांच्यावर सहकारी संस्था विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

९) आर. आर. जाधव यांच्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

१०) ओमप्रकाश देशमुख यांची मुद्रांकशुल्क विभागात बदली करण्यात आली आहे.

११) वळसा नायर यांच्यावर पर्यटन विभागाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

१२) एस. एस. डुंबरे यांच्यावर MEDAच्या डीजी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

१३) पराग जैन यांची सामाजिक न्याय विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

१४) दिनेश वाघमारे यांच्यावर विद्युत पारेषण विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

१५) आयुष प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

१६) अरविंद कुमार यांची एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक पदावरून जलसंवर्धन, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. याआधी ग्रामविकासाची जबाबदारी राजीव जलोटा यांच्याकडे देण्यात आली होती. पण त्यांनी ही जबाबदारी न स्विकारल्यामुळे अरविंद कुमार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. राजीव जलोटा यांनी विक्रीकर आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पण नव्या बदल्यामध्ये त्यांच्याकडे अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

१७) एस. आर. जोंधळे यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी पदावरून जीएडीचे सचिव म्हणून बदली झाली आहे.

१८) आर. डी. निवतकर यांची सहायक सचिव पदावरून मुंबई शहरचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

१९) यु. ए. जाधव यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

२०) किरण पाटील यांची कृषी विभागाचे उप सचिव पदावरून मुख्य सचिव कार्यालयामध्ये उपसचिव पदावर बदली झाली आहे.

First Published on: January 21, 2020 7:46 PM
Exit mobile version