‘लॉकडाऊन’ केले तर पॅकेज मिळालेच पाहिजे; शेवटी पैसा जनतेचाच आहे, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

‘लॉकडाऊन’ केले तर पॅकेज मिळालेच पाहिजे; शेवटी पैसा जनतेचाच आहे, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोवपण्यासाठी राज्यासह मुंबईत सर्वच आरोग्य यंत्रणा, महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. हा ताण कमी करण्यासाठी आता पुन्हा एकदा राज्य सरकार action मोडमध्ये आले. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंधही लागू केले आहेत. यामध्ये दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि विकेंडला लॉकडाऊन जाहीर केले आहे. याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, एक आठवडा झाला असून अद्याप कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट होताना दिसत नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडून बोले जात आहे. त्याचप्रमाणे आता जर ‘लॉकडाऊन’ जाहीर केले तर सामान्यांना पॅकेजही जाहीर केले पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, याबाबत नागरिकांना विचारणा केली असता त्यांनीही विरोधकांच्या मागणीचे समर्थन करत आम्हाला पॅकेज देऊ करावे, अशी मागणी केली आहे. कारण राज्य सरकार स्वत:च्या खिशातले नाहीतर जनतेचाच पैसा वापरत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन हा पर्याय असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यावर विरोधकांनी राज्य सरकारला लॉकडाऊचा निर्णय घेतल्यास जनतेसाठी पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका माडली. तसेच गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितले होते. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना लॉकडाऊन लागल्यास पॅकेज मिळणार का? हे पाहावे लागणारआहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून गेल्यावर्षी देखील लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. हातावर पोट असलेल्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. बऱ्याच जणांच्या नोकऱ्याही गेल्या. तर खायचे काय असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या समोर उभे होते. त्यामुळे गेल्यावर्षी लॉकडाऊनचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आता जर लॉकडाऊन लावला तर सरकारने जनतेची जबाबदारी घ्यावी. तसेच राज्य सरकारने प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करावे. कारण जरी सरकारने पैसा जमा केला तरी तो नागरिकांचाच असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनतेचा लुबाडलेला पैसा आता त्यांना द्यावा. – सुनील जाधव, नागरिक

कोरोनाच्या आधी भुकेने मरु

कोरोनाची भिती सर्वांना आहे. प्रत्येकाला आपली काळजी घेता येते. त्यामुळे आम्ही आमची काळजी घेऊ शकतो. परंतु, सरकारला कोरोनाचे कारण देत लॉकडाऊन करायचा असेल तर त्यांनी जनतेची सोय करावी. त्यांच्या आरोग्याची सोय करावी. कोरोना आहे म्हणून लॉकडाऊन लावता. मात्र, एखाद्या नागरिकाला कोरोना झाला तर त्याला आरोग्य यंत्रणेकडून बेड मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची काय आणि कसली काळजी घेता. तसेच आता जर तुम्हाला लॉकडाऊन लावायचे असेलच तर तुम्ही आमच्या खात्यातही पैसे जमा करा. – प्रदीप वरवटकर, नागरिक


हेही वाचा – कोरोनामुळे रोग प्रतिकारक क्षमतेत होतेय घट, दुसऱ्यांदा लागण होण्याचा धोका वाढला – संशोधन


 

First Published on: April 12, 2021 4:02 PM
Exit mobile version