रात्रीतून कुणाला अटक झाली तर

रात्रीतून कुणाला अटक झाली तर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारतांना मोठे वक्तव्य केल्याने राजकिय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात सध्या मोठया घडामोडी घडत असून काय माहीत रात्रीतून कुणाला अटक झाली तर… असं वक्तव्य त्यांनी केल्याने चंद्रकांत पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर आहेत. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असून पक्षांतर्गत फोफावलेली गटबाजी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आज नाशिकमध्ये पक्ष पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. आज दिवसभर त्यांच्या उपस्थितीत विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी नाशिक येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता आपण पत्रकार परिषदेत सविस्तर बोलू असे सांगत राज्यात मोठया घडामोडी घडत आहेत. काय माहीत रात्रीतून कुणाला अटक झाली तर तुम्हाला माझी प्रतिक्रिया घ्यावी लागेल असे वक्तव्य त्यांनी अनौपचारिक गप्पा मारताना केलं त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पण सध्या सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी दिलेला हा सूचक इशारा तर नाही ना अशी चर्चाही मग रंगली.

दरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनीलाँड्रींग प्रकरणी कारवाई सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळा तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनीलाँड्रींग प्रकरणी कारवाई सुरू आहे.

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील
– राज ठाकरे आणि आमचे चांगले संबध
– त्यांच्या मी घरी पण जाऊ शकतो
– त्यांच्या माझ्या वेळा जुळल्या तर इथे पण एक कप चहा सोबत घ्यायला हरकत नाही
– नाशकात युती होईल की नाही हे सांगणे माझा अधिकार नाही
– मी मारतो तू लागल्यासारखं कर अस यांच सुरु आहे
– नाना पटोल यांचे नाव न घेता टोला
– जनता निवडणुकीची वाट बघते आहे
– तीन पक्ष आहेत. रोज सकाळी गेम तयार करतात आणि त्यात ठरते की आज कोणी क़ाय गेम खेळायचा
– फडणवीस शहा भेट ही रूटीन भेट

 

First Published on: July 17, 2021 10:34 AM
Exit mobile version