…तर मास्क न वापरल्यास १००० रुपये दंड आकारू; अजित पवार यांनी दिले संकेत

…तर मास्क न वापरल्यास १००० रुपये दंड आकारू; अजित पवार यांनी दिले संकेत

पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या २०० ऑक्सिजन बेडयुक्त रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यावेळी भाषणात अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, आपण फिजिकल डिस्टन्स ठेवले पाहिजे, मास्क वापरला पाहिजे. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर परिसरात मास्क वापरला नाही तर १००० रुपये दंड आकारला पाहिजे, थोड्या वेळात पुणे महापालिकेची बैठक होणार आहे. मास्क बंधनकारक असून अजूनही तो व्यवस्थित वापरला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

काय म्हणाले अजित पवार

गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभे केले आहे. त्याचे अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असे होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे. सिरम इन्स्टिट्यूटने भारती हॉस्पिटलमध्ये कोविडवरील लशीची मानवी चाचणी सुरु केली आहे, खासगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेकडून लेखा परीक्षण सुरु आहे. खासगी रुग्णालयाने जास्त पैशाचा मलिदा काढण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.

तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव,शिरुर या ग्रामीण भागातील रुग्णदेखील जम्बो रुग्णालयात येतील. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव होणार नाही. हॉस्पिटलची भरभराट होऊ दे, असे बोलावेसे वाटत नाही. शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप होत आहे. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत १५ दिवसांमध्ये २०० ऑक्सिजनयुक्त बेड असलेले रुग्णालय उभारले. हे हॉस्पिटल आज नागरिकांच्या आरोग्य सेवेत समर्पित करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –

‘आम्ही दोघे एकाच मंचावर येणार म्हटल्यावर चर्चा सुरू’, अजितदादांनी सुनावले

First Published on: August 28, 2020 12:54 PM
Exit mobile version