घरमहाराष्ट्र'आम्ही दोघे एकाच मंचावर येणार म्हटल्यावर चर्चा सुरू', अजितदादांनी सुनावले

‘आम्ही दोघे एकाच मंचावर येणार म्हटल्यावर चर्चा सुरू’, अजितदादांनी सुनावले

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, शुक्रवारी पिंपरी – चिंचवड येथे कोविड १९ रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी हे दोघेही एकाच मंचावर उपस्थित होते. सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार पुन्हा स्वगृही परतत महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या त्या भेटीनंतरपासूनच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही एकत्र आले की राजकीय तसेच माध्यमांमध्ये चर्चा सुरू होतात. तशीच चर्चा कालपासून सुरू होती, त्याचा समाचार अजितदादांनी भाषणात घेतला.

कोरोना संकटकाळात महाराष्ट्र एकत्र 

या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात या चर्चावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही दोघे एकाच मंचावर येणार म्हटल्यावर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या. परंतू त्यांना चंद्रकांत पाटील येथील येथे येणार हे त्यांना माहिती नव्हते. अन्यथा त्याच्याची चर्चा रंगल्या असत्या. राजकारणात आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत. निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात असतो. परंतू निवडणुका झाल्यानंतर हा सत्ताधारी पधाचा, हा विरोधी पक्षाचा असा भेदभाव न करता (कोरोना) अशा संकटाच्या वेळी एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा कोणती उणीव जर राहत असेल तर ती दाखवून देणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे’, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या २०० ऑक्सिजन बेडयुक्त रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले की, गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभे केले आहे. त्याचे अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असे होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे.

हेही वाचा –

सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; UGC च्या परीक्षा होणारच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -