प्राणी, पक्ष्यांची बेकायदा खरेदी महागात पडणार…

प्राणी, पक्ष्यांची बेकायदा खरेदी महागात पडणार…

प्राणी संग्रहलयातील प्राणी (फोटो सौजन्य- youtube)

सोलापूर महापालिका अडचणीत येणार

महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाने दोन वर्षांपूर्वी केलेली बेकायदा पक्ष्यांची खरेदी महापालिकेला महागात पडणार आहे. राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने या खरेदीला आक्षेप घेतला असून पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे महापालिका आयुक्तांना सांगितले आहे.प्राधिकरणाने महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाची मान्यता काढून घेण्याबाबतची नोटीस महापालिकेला यापूर्वी पाठवली होती. प्राणी संग्रहालयासाठी महापालिकेतून आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता न केल्याचा ठपका प्राधिकरणाने या नोटीसमध्ये ठेवला होता. एकूण बाबींवर प्राधिकरणाचा आक्षेप असून पक्ष्यांची बेकायदा केलेली खरेदी हा त्यापैकी एक गंभीर मुद्दा आहे.

या संदर्भात राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे सचिव डी.एल. सिंग यांनी सुनावणी घेतली. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकने महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी कांजणे यावेळी उपस्थित होते. प्राणीसंग्रहालयातील पक्षी आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात विचारणा केली. सुरक्षा भिंत, प्राणी ठेवण्याचे पिंजरे, त्यांना देण्यात येणारी अन्य सुविधा यावरही सिंग यांनी बोट ठेवले. दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या पक्षांचा मुद्दा त्यांनी गांभीर्याने घेतला. वेगवेगळ्या प्रकारचे हे पक्षी खरेदी करणे बेकायदेशीर आहे. नंतर ते प्राणी संग्रहालयात ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे.

राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात प्राधिकरणाला कोणते प्राणी आणि पक्षी ठेवता येतील. याची माहिती दिलेली असतांना त्याऐवजी अन्य पक्ष्यांची खरेदी करुन ते प्राणीसंग्रहलयात ठेवण्याचा गंभीर गुन्हा महापालिकेने केला आहे. या संदर्भात पोलीसात गुन्हा दाखल केला जाईल, असे सिंग यांनी सुनावणीदरम्यान आयुक्त ढाकने यांना सांगितले. देशात दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांची तस्करी करणारी टोळी कार्यरत आहे. महात्मा गांधी प्राणी संग्रहलयाने अश्याच टोळीकडून या पक्षीन आणि प्राण्यांची खरेदी केली असल्याचा प्रधीकरणाला संशय आहे. ही टोळी शोधण्यासाठी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय प्राधीकरणाचे सचिव सिंग यांनी घेतला आहे. पोलीसात गुन्हा नोंद झाल्या नंतर खरेदीची सखोल चौकशी करण्यात येईल.

First Published on: May 29, 2018 7:58 AM
Exit mobile version