बाप्पाच्या आगमनापूर्वी वरूण राजाची बरसात; मुंबई, पुण्यात पावासाला सुरुवात

बाप्पाच्या आगमनापूर्वी वरूण राजाची बरसात; मुंबई, पुण्यात पावासाला सुरुवात

राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील नदी, नाले तुडुंब भरले आहेत. यात अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा काही महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात ऐन गणेशोत्सवाला पुण्यासह मुंबई आणि काही महत्त्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, आठवड्याभर पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा दमदार पाऊस सुरु झाला आहे, ज्यामुळे राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असताना वरूण राजाची बरसात सुरु झाली आहे. ज्यामुळे हवामान विभागाकडून आता काही महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा गणेशोत्सवात राज्यात 29 ऑगस्टपासून पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे बहुतेक ठिकाणी हलक्या पावसाने सुरुवात केली आहे. यात पुणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पावसाने सुरुवात केली आहे. यात कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पुणे, मुंबई आणि उपनगर, कोल्हापूर, कोकण आणि साताऱ्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे, यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी उपमुख्यमंत्र्यांसह 64 नेत्यांचा राजीनामा

First Published on: August 30, 2022 3:39 PM
Exit mobile version