विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट; राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता

विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट; राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता

राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारली आहे. मात्र, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (IMD Yellow Alert In Marathwada Vidarbh west maharashtra)

पश्चिम महाराष्ट्रात देखील अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. बुधवारपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे.

याशिवाय, 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे.


हेही वाचा – …याच कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, चिन्हाबाबत शिवसेनेने केले स्पष्ट

First Published on: October 6, 2022 8:55 AM
Exit mobile version