जाणून घ्या नरक चतुर्दशीचे महत्त्व

जाणून घ्या नरक चतुर्दशीचे महत्त्व

प्रातिनिधिक फोटो

दरवर्षी दिवाळीच्या एक दिवस अगोदर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. ही नरक चतुर्दशी अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी येते. या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. या अभ्यंगस्नान आणि नरक चतुर्दशीला आजही तितकेच महत्त्व आहे. वाईट विचारांचा, अत्याचारांचा सर्वनाश व्हावा, यासाठी ही चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी घरात आणि अंगणात साफसफाई केली जाते. त्याचबरोबर घरातील सगळे सदस्य सुर्योदयापूर्वी अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. घरादारांना फुलांचे तोरण लावले जाते.

हेही वाचा- मुंबईत कागदी कंदिलांची मागणी जास्त

काय आहे नरक चतुर्दशीची कहानी?

नरक चतुर्दशीची एक पौराणिक कहानी आहे. या कथेनुसार महाभारतात नरकासूर नावाचा राजा होता. या राजाने १६ हजार १०८ स्त्रियांना आपल्या बंदिखान्यात डांबले होते. नरकासूराने प्रजेतील लोकांचाही छळ केला. भगवान श्रीकृष्णाने या नरकासूर राजाचा वध करुन स्त्रियांची बंदिखान्यातून सूटका केली. ज्या दिवशी या नरकासूराचा वध करण्यात आला तो दिवस होता अश्विन कृष्ण चतुर्दशीचा. परंतु, नरकासुराने अंतिमवेळी श्रीकृष्णांकडे एक वर मागितला, तो वर म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे चंद्रदयाच्या वेळी जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होणार नाही. म्हणून नरक चतुर्थीला अभ्यंगस्नान केले जाते.

हेही वाचा – यंदा राजकारण्यांकडून उटण्यासोबत कंदीलही मिळणार!

शहरी भागात ‘अशी’ साजरी होते नरक चतुर्दशी

शहरी भागात घराघरातील लोक आपल्या वाहनांची पूजा करुन वाहनाला हार घालतात. दरवाज्याबाहेर रांगोळी काढली जाते. त्याचबरोबर विविध कार्यालयांमध्येही आज उत्साहाचे वातावरण असते. विविध कार्यालयांमध्ये कंदिल आणि रांगोळी काढूण कार्यालय खूप छान प्रकारे सजवण्यात येत.

हेही वाचा – आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या; पारधी समाजाची मागणी

ग्रामीण भागात अशी साजरी होते नरक चतुर्दशी

ग्रामीण भागात सकाळी लवकर उठून महिला घराची साफसफाई करतात. अंगणाला शेणाने सारतात आणि त्यावर सुंदर रांगोळी काढली जाते. या रांगोळीच्या मध्यभागी दिव्याची लखलखणारी पणती ठेवली जाते. संध्याकाळी गावातील सर्व लहान मुले दिवा घेऊन गावातल्या देवळात जातात. तिथे गाभाऱ्यात दिवा ठेऊन ते परत घरी येतात. घरी पंचपक्वानाचे जेवन केल्यावर लहान मुले फटाके फोडतात. शेतकरी शेतामध्ये, गायी-म्हशींच्या गोठ्यामध्ये दिवे लावतात. ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये सासरी गेलेल्या मुली घरी येतात, त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत आनंददायी असते.


हेही वाचा – दिवाळीत रांगोळीचे महत्त्व

First Published on: November 6, 2018 10:00 AM
Exit mobile version