जन्मदात्री शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

जन्मदात्री शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

राज्यातील राजकीय घडामोडी पाहता आज फार मोठी घडामोड होण्याची शक्यता होती. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना काय काय अनुभव आले हे शेअर केलं. तसेच, हे पद मी सोडायला तयार आहे, पण शिवसैनिकांनी मला वैयक्तिक येऊन सांगावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांच्या आजच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना त्यांनी नेमकी आज काय काय घोषणा केली हे थोडक्यात जाणून घेऊयात. (Important 10 topic from Uddhav Thackeray’s Live)

हेही वाचा – मी मुख्यमंत्री पद सोडेन पण…, उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

उद्धव ठाकरे यांचा संवाद जशाचा तसा

१) माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे. त्यामुळे बोलण्यासारकं बरंच काही आहे. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही अशा परिस्थितीत मला जे करायचे ते सर्व प्रमाणिकपणे केले. तेव्हा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्री म्हणून माझा गौरव झाला.

२) दरम्यान माध्यमात अनेक अफवा पसरल्या आहेत. मी गेले काही दिवस कोणाला भेटत नव्हतो. माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. ते दोन-तीन महिने वाईट गेले. त्यामुळे लोकांना भेटता येत नव्हते. मात्र, भेटत नसलो तरीही कामं थांबली नव्हती. पहिली कॅबिनेट मी रुग्णालयातून केली.

३) शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य आणि एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. विधानसभेत हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले शब्द आहेत. शिवसेना कधीही हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही

४) ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं म्हटलं जातंय. २०१४ एकट्याच्या ताकदीवर शिवसेनेचे ६३ आमदार  निवडून आले ते पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने दिलं हेही लक्षात ठेवा.

५) आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणुक झाली. हाॅटेलमध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका येते. मी कोणतंही काम जिद्दीने पूर्ण करणारा आहे. २०१९ मध्ये वेगळा मार्ग पत्कारावा लागला. महाविकास आघाडीसाठी तिन्ही पक्ष एकत्र बसले. चर्चा केली. चर्चेनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री पद स्विकारण्याची विनंती केली. सोनिया गांधींनीही आग्रह केला. मुख्यमंत्री पद स्विकारणं हा स्वार्थ नव्हता. या काळात कसलाही अनुभव नसताना अनेकांनी खूप मदत केली. प्रशासनानेही खूप सहकार्य केलं.

६) कमलनाथ आणि पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पण माझ्याच लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. आता काय करायचं? मी त्यांना आपलं मानतो, त्यांचं मला माहित नाही. मग तुम्ही का पळता? त्या ३४ आमदारांनी येऊन मला कोणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी पद सोडायला तयार आहे. आताच वर्षावरील मुक्काम हवलतो. पण हे सर्व समोर येऊन बोला.

७) शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेनवर वार करू नका. मी राजीनामा पत्र लिहून ठेवतो. तुम्ही या आणि राज्यपालांकडे माझं पत्र नेऊन द्या. मला कोविड झाला आहे, त्यामुळे मी जाऊ शकत नाही. पण तुम्ही जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत आहेत, तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. मी संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे.

८) मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असेल तर मान्य आनंदच आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा झाला तरी चालेल. पण जे काही आहे, ते माझ्या समोर येऊन सांगा.

९) मी मुख्यमंत्री पदी नालायक आहे, असं मला माझ्यासमोर येऊन सांगा. मग मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः सांगा. मी तुमचं फेसबूक लाईव्ह पाहिलं. आम्हाला समोर यायला संकोच वाटतोय. पण तुम्ही मुख्यंमत्री म्हणून नको आहात. त्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे.

१०) अडीच वर्षात कुठे आपली भेट झाली. मी आताही पदावरून पायउतार व्हायला तयार आहे. एकाने जरी माझ्याविरोधात मतदान केलं तर ती माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, मुख्यमंत्री पदी राहायची माझी इच्छा नाही. मी कुटुंब प्रमुख आहे, असं अनेकांनी मला सांगितलं. ही माझी कमाई आहे. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

First Published on: June 22, 2022 6:23 PM
Exit mobile version