पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार प्रचार करत आहेत. मात्र, कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रचाराला अडचण येत आहे. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना थोडासा दिलासा दिला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील करताना काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करणं सर्व उमेदवारांना अनिवार्य आहे. भारतीय निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार मोहिमांसाठी राजकीय कार्यक्रमांना पाठींबा असणार आहे. परंतु राजकीय कार्यक्रम बंदीस्त ठिकाणी असल्यास त्या उपलब्ध जागेच्या ५० टक्के क्षमतेपर्यंत लोकं असावीत, परंतु २०० पेक्षा अधिक नसावेत. तसंच, या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन होतं की नाही, यासाठी स्वतंत्र अधिकारी किंवा कर्मचारी नेमण्यात येणार आहे. जर नियमांचा भंग झाल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे नव्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. मात्र, जमावबंदी असणार आहे. तसंच १६ तारीखला रात्री ८ वाजल्यापासून ते १८ एप्रिलपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी शिथील करण्यात आली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी येत्या १७ एप्रिलला मतदान होणार आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यामुळे तिथली जागा रिकामी झाल्याने पोटनिवडणूक लागली आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्यासमोर भाजपचे समाधान आवताडे यांचं आव्हान असणार आहे.

 

First Published on: April 8, 2021 8:26 PM
Exit mobile version