‘धर्मवीर’ चित्रपटात तथ्यांशी साफ मोडतोड; शिवसेनेचा गंभीर आरोप

‘धर्मवीर’ चित्रपटात तथ्यांशी साफ मोडतोड; शिवसेनेचा गंभीर आरोप

मुंबई – धर्मवारी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (Dharmaveer Mukkam post Thane) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला शिवसैनिकांसह अनेक रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला. केवळ ठाणे, मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर हा चित्रपट अनेक आठवडे हाऊसफुल्ल होता. मात्र, हा चित्रपट बनवताना अनेक तथ्यांची साफ मोडतोड केली होती, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज छापून आलेल्या अग्रलेखात हा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘हरहर महादेव’च्या वादात शिवसेनेची उडी; राज्यकर्ते बदलताच…

मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे. असे आता वारंवार घडू लागले, असं या अग्रलेखात म्हटलं आहे. हरहर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने राज्यात वाद सुरू आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सर्वांत आधी या चित्रपटातील आक्षेपार्ह संदर्भांवर भाष्य केलं. त्यानंतर, राष्ट्रवादीनेही या वादात उडी घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील हरहर महादेवचा शो बंद पाडला. आता शिवसेनेनेही या वादात उडी घेतली आहे. या चित्रपटावर भाष्य करताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या चित्रपटाबाबतही भाष्य केलं आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी धर्मवीर चित्रपटात स्वतःच कॅरेक्टर घुसवलं, संदीप देशपाडेंचा आरोप

राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरते राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो. मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे. असे आता वारंवार घडू लागले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इतिहासाचा कळस रचला त्याची मोडतोड ‘गल्लाभरू’ चित्रपटांसाठी केली जाऊ नये,” अशी टीका अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हेही वाचा – धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला, म्हणाले आनंद दिघेंचा मृत्यू…

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला. त्यावेळी शिवसेनेत सारंकाही आलबेल होतं. या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते गेले होते. तसंच, या अनेक नेत्यांनी या चित्रपटाचं तेव्हा कौतुकही केलं होतं. मात्र, जून महिन्यात शिवसेनेत फुट पडली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन बंडखोरी केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही बंडखोरी केल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. तेव्हापासून धर्मवीर या चित्रपटातील अनेक प्रसंग सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. त्यातच, आता शिवसेनेने या चित्रपटातील तथ्यांवरच आक्षेप घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.

First Published on: November 14, 2022 8:54 AM
Exit mobile version