मविआमध्ये अपक्ष आमदारांची पळवापळवी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदारांशी संपर्क

मविआमध्ये अपक्ष आमदारांची पळवापळवी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदारांशी संपर्क

मविआमध्ये अपक्ष आमदारांची पळवापळवी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदारांशी संपर्क

विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून ६ तर महाविकास आघाडीकडून ५ उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण १० जागांवर निवडणूक होत आहे. शिवसेनेचे सोडल्यास राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपला आपल्या उमेदवारा जिंकवण्यासाठी मतांची गरज आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतांची संख्या जुळवण्यासाठी महाविकास आघाडीमध्येच फोडाफोडी सुरु झाली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये अपक्ष आमदारांची पळवापळवी सुरु झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. अपक्ष आणि लहान पक्षांशी वेगवेगळा संपर्क सांधण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होणार असे निश्चित आहे. परंतु दोन्ही पक्षातील प्रत्येकी दुसरा उमेदवार जिंकवण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. या मतांची पुर्तता करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रयत्न सुरु झाले आहेत.

विधान परिषदेची निवडणूक २० जून रोजी होणार आहे. अवघ्या तीन दिवसांवर निवडणूक असल्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अपक्ष आमदारांच्या भेटी घेत आहेत. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भाई जगताप आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली आहे. त्यांच्याकडील ३ आमदारांची मते मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरु झाला आहे.

विधान परिषदेसाठी उमेदवारांनी अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरु केले आहे. आपली जागा सुरक्षित करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रयत्न करत आहेत. राज्यसभा निवडणुकीमध्येही हितेंद्र ठाकूर यांची महाविकास आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली होती. यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना समर्थित अपक्ष आमदारांना विधान परिषदेच्या मतांसाठी फोन गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा गंभीर दाखल घेतली आहे. महाविकास आघाडीमध्येच मतांसाठी फोडाफोडी सुरु झाली आहे. शिवसेनेकडून गीता जैन, राजेंद्र पाटील यड्रावकर, नरेंद्र बोंडेवार या अपक्ष आमदारांशीसुद्धा उमेदवार चर्चा करत आहेत.


हेही वाचा : राजनाथ सिंह यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन, राष्ट्रपती निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा

First Published on: June 17, 2022 9:38 AM
Exit mobile version