पार्थ पवार यांच्यासाठी शरद पवारांवर वाढता दबाव

पार्थ पवार यांच्यासाठी शरद पवारांवर वाढता दबाव

पवार घराण्यासाठी कुणालाही या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतल्याने मावळ मतदार संघातून इच्छूक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांची संधी हुकली आहे, मात्र तरीही पक्षातून पार्थ पवार यांच्या उमदेवारीसाठी पवारांवर दबाव वाढू लागला आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शनिवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत मावळमधून पार्थ पवार यांनाच उमेदवारी देण्याची मागणी जयंत पाटील यांनी शेकापतर्फे शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवारांच्या भूमिकेनंतर पक्षाने मावळमध्ये पर्याय शोधण्यास आरंभ केला. माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचे नाव पुढे आले. पक्षातर्फे त्यांना तशी विचारणाही झाली होती. मात्र पार्थ पवार यांना इथून निवडणूक लढवायची असून मावळमधील जनसंपर्क दौरे त्यांनी सुरूच ठेवले आहेत.

अखेर धाकल्या पवारांसाठी थोरल्या पवारांची निवडणुकीतून माघार

दुसरीकडे पार्थने निवडणूक लढवावी, अशी अजित पवार यांचीही इच्छा आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पार्थच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे शरद पवार यांना त्यांच्या पुतण्याच्या हट्टापुढे दोन पावले मागे यावे लागणार का, हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

First Published on: March 11, 2019 4:43 AM
Exit mobile version