टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर भारताची बंदी

टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर भारताची बंदी

TikTok मोबाईल App

भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या मोबाईल अ‍ॅपमध्ये टीक-टॉक, युसी ब्राऊसर यांच्यासह इतर चिनी अ‍ॅप आहेत. हे अ‍ॅप देशाची सुरक्षा, अखंडता आणि स्वायत्तबाबत पूर्वग्रहदुषित असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. या अ‍ॅपमध्ये शेअर इट, क्वाई, बलदू मॅप, शेइन,क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लाईकी, यु कॅन मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊसर, व्हायरस क्लिनर, एप्लस ब्राऊसर, रोमवे, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्युटी प्लस, वूई चॅट, युसी न्यूजस, क्यूक्यू मॅल, वेबो, झेंंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफिड, बिगो लाईव्ह, सेल्फीसिटी, मी व्हिडिओ कॉल-झाओमी, वूईसिंक, ईएस फाईल एक्सप्लोरर, विवा व्हिडिओ, मेईटू, विगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयु रेकॉर्डर, वॉल्ट-हाईड, कॅचे क्लिनर, डीयु क्लिनर, डीयु ब्राऊसर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, वूई मीट, स्वीट सेल्फी, बाईदु ट्रान्स्लेट, वीमेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सेक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लाँचर, यु व्हिडिओ, वी फ्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लिजंड, डीयु प्रायव्हसी या अ‍ॅपचा समावेश आहे.

तसेच क्लिन मास्टर, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, वूई मीट, स्वीट सेल्फी, बाईदु ट्रान्स्लेट, वीमेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सेक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लाँचर, यु व्हिडिओ, वी फ्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लिजंड, डीयु प्रायव्हसी या अ‍ॅपचासुद्धा या यादीत समावेश आहे. चीनच्या या अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे आगामी काळात चीन-भारताचे संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनकडून त्याबाबत प्रतिक्रिया आली नसली तरी आगामी काळात चीन नक्कीच त्याबाबत कारवाई करू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

First Published on: June 29, 2020 9:56 PM
Exit mobile version