देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) मागील काही दिवस सातत्याने वाढत आहे. मात्र सोमवारी नोंदवलेल्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या (Coronavirus Patients) कमी आहे. देशभरात कोरोनाचे 13 हजार 615 नवीन रुग्ण आढळले त्यानंतर देशातील संक्रमितांची संख्या 4,36,52,944 वर पोहोचली आहे. तसेच, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 043 वर पोहोचली आहे. (India coronavirus cases decrease 13615 new cases registered in last 24 hours 20 deaths)

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देसभरात मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 474 झाली आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 043 वर पोहोचली आहे. त्यामुळे ही एकूण रूग्णसंख्येच्या 0.30 टक्के आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 235 नवे कोरोनाबाधित आढळले आहे, तसेच, 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दर 1 हजार 446 दिवसांवर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 1 हजार 189 रुग्ण आढळले आहेत. तसेच, 1 हजार 529 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 78 लाख 39 हजार 208 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 47 हजार 978 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 18 हजार 27 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या 40 जागा रिक्त; आणखी पाचजण निवृत्तीच्या मार्गावर

First Published on: July 12, 2022 2:41 PM
Exit mobile version