यंदा देशात १०१ टक्के पाऊस

यंदा देशात १०१ टक्के पाऊस

भारतीय हवामान विभागाने देशात 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस सरासरीच्या सामान्य राहणार आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटले जाते.भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याची शक्यता आहे.

तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

जून ते सप्टेंबर मौसमी पाऊस
भारतीय हवामान विभागाने जून महिन्यात देशभरातील विविध भागांचा सर्वसाधारण अंदाज वर्तवला आहे. पूर्व भारत, मध्य भारत, हिमालय आणि मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहील. उत्तर पूर्व भागात, दक्षिण भारतातील दख्खनचे पठार, उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून 3 जूनला केरळमध्ये
भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असे सांगितले होते.

First Published on: June 2, 2021 4:00 AM
Exit mobile version